Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आणखी > अध्यात्म

महाराणा प्रतापसिंह जयंती

वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

Maharana Pratap Singh Jayanti: चिखली शहरात महाराजा महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला गेला. अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गेले.


वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

Maharana Pratap Singh Jayanti |

 

चिखलीत हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन

चिखली (Maharana Pratap Singh Jayanti) : मेवाडचे महाराजा, वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह सिसोदिया यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप प्रेमींनी जयघोष केला. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह हे वीरता, त्याग, धैर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाचे मूर्तिमंत प्रतीक मानले जातात. ९ मे १५४० रोजी कुंभलगड येथे सिसोदिया राजवंशात त्यांचा जन्म झाला. राणा उदयसिंह आणि महाराणी जयवंता कुंवर यांच्या पोटी जन्मलेल्या हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांनी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. “प्राण गेला तरी बेहत्तर, पण शत्रूपुढे झुकणार नाही,” ही त्यांची भूमिका होती.

अकबराच्या बलाढ्य मोगल सैन्याशी अत्यल्प साधनसामग्रीच्या जोरावर हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. हळदीघाटाच्या युद्धात त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. या युद्धात भिल्ल समाज व वनवासी बांधवांनी दिलेली साथ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. डोंगराळ भागातील युद्धतंत्राचा प्रभावी वापर करून त्यांनी मोगल सैन्याला मोठा प्रतिकार केला. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह (Maharana Pratap Singh Jayanti) यांच्या व्यक्तिमत्त्वात शौर्याबरोबरच क्षत्रिय धर्माचीही झलक दिसून येत होती. युद्धात ते दोन तलवारी बाळगत असत. त्यातील एक स्वतःसाठी तर दुसरी निहत्थ्या शत्रूसाठी असल्याची कथा आजही प्रेरणादायी मानली जाते. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी त्यांनी राजवैभवाचा त्याग करून जंगलात राहणे स्वीकारले होते. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या चेतक या निष्ठावंत अश्वाची शौर्यगाथाही इतिहासात अमर झाली आहे. रणांगणात आपल्या धन्याचे प्राण वाचवण्यासाठी चेतकने प्राणांची बाजी लावली होती. त्याच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक आजही त्याच्या स्वामिनिष्ठेची साक्ष देते.

चिखली येथे उभारण्यात आलेला हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह (Maharana Pratap Singh Jayanti) यांचा भव्य अश्वारूढ पुतळा हा महाराष्ट्रातील अद्वितीय स्मारक मानला जातो. तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झालेला हा सुमारे १३ क्विंटल ब्राँझ धातूपासून तयार केलेला पुतळा शहराचे आकर्षण ठरला आहे. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रताप प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. “वीरशिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह की जय”,  अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि पराक्रमाच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

यावेळी डॉक्टर प्रतापसिंह राजपूत डॉक्टर प्रताप सिंह परिवार ,समाधान गाडेकर बिदुसिंग इंगळे, हरिभाऊ परिहार, शिवदास राजपूत, गजानन जाधव  श्रीकांत सुरडकर श्रीकांत सोळंकी, सागर परिहार, किशोर सोळंकी, प्रणव राजपूत, गोपाल जाधव,अतुल सदार, सम्राट अशोक फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान विशाल खरात वंचित बहुजन आघाडी चिखली शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे , कोषाध्यक्ष सुमेध जाधव, प्रा राऊत सर, निकाळजे साहेब, विलास घोरपडे, संजय जाधव, प्रवीण खरात, मिलिंद माघाडे, सचिन कस्तुरे, , संजय जाधव, सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकारणी सदस्य चिखली  व  हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह  प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related to this topic: