Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आणखी > अध्यात्म

अधिक महिन्याचे महत्त्व!


अधिक महिन्याचे महत्त्व

अधिक मासाला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात. 
त्रिकालज्ञ यज्ञेश्वर ज्ञानदेवा।
नमस्कार माझा पुरुषोत्तम वासुदेवा।।
कपिंद्रा कलानाथ वैâवल्यदाता।
कालीयामर्दन कलीनाश कर्ता।
केशव कृपाळू कुशल स्वभावा।
नमस्कार माझा पुरुर्षोत्तम वासुदेवा।।

हिंदुधर्मात ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत. वर्षातील बारा महिने सण, उत्सव, व्रते, धार्मिक रूढी व परंपरा या सर्वांमधून मानवाने, ईश्वर भक्ती करावी व आपले कल्याण करून घ्यावे, या उदात्त हेतूने ऋषिमुनींनी व संत-महात्म्यांनी कालानुसार प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगून लोकांना भक्तीमार्ग दाखविला. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी कालगणनेनुसार अधिक मासाची निर्मिती केली आहे. आपली कालगणना चंद्रमासाची आहे. दरवर्षाच्या ११ तिथीची शिल्लक उरत-उरत ३० तिथी झाल्या की एक 'चांद्रमास' अधिक मास म्हणून येतो. 
चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे महिने साधारणपणे १२ वर्षांनी अधिक मासात येतात. म्हणजेच दर १२ वर्षांनी या महिन्यात अधिक मास येतो. तर आषाढ महिना १८ वर्षांनी अधिक मास असतो. भाद्रपद महिन्यात २४ वर्षांनी अधिकमास येतो. तर आश्विन महिना हा १४१ वर्षांनी अधिकमास येतो; परंतु भाद्रपद मासापर्यंतच 'अधिकमास' धरला जातो. 
आश्विन व कार्तिक महिने अधिक झाले तरी त्यास 'अधिकमास' संबोधनाची प्रथा नाही. ज्यावर्षी आश्विन महिना अधिक होतो. त्यावेळी पौष महिन्याचा क्षय होतो. अशावेळी दोन प्रहरापर्यंत मार्गशीर्ष आणि दोन प्रहरानंतर पौष मानून दोन्ही मासातील धर्मकृत्ये करावीत, असे शास्त्रांत सांगितले आहे. अशा जोडमासाला 'संसर्प' असे म्हणतात. तसेच मार्गशीर्ष पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांना जोडून 'अधिकमास' येत नाही. 
अधिकमासात दोन्ही पक्षात शुभ एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादशीला 'पद्मिनी' तर वद्य पक्षातील एकादशीला 'परमा' असे संबोधले जाते. अधिकमासाची देवता 'भगवान विष्णू' मानली जाते. म्हणूनच या महिन्याला 'पुरुषोत्तम मास' म्हटले आहे. भगवान विष्णू हा भगवंत श्रीकृष्णाचा ९ वा अवतार मानला जातो. यावर्षी अधिक मास  दि.१७/५/२०२६ ला पासून सुरू झाला आहे.'अधिकस्य अधिक फलं मलमासे प्राप्तं' अधिक महिन्यात अल्प व्रत केले तर खूप पुण्य मिळते, अशी जनभावना आहे. 
आपल्या हातून कळत नकळत अनंत पापे घडत असतात. त्याचा क्षय व्हावा म्हणूनच हा मलमास भगवंतानी मानवासाठी निर्माण केला आहे, कारण या नरदेहातच नराचा नारायण होतो. म्हणूनच प्रत्येकाने माझी साधना कशी सफल होईल, याचा विचार करावा. नाहीतर गेला गेला नरदेह। मग वैâसा भगवंत।  जे व्रत, तप, पूजा, दान तुम्ही बारा महिने करूनही जे पुण्य तुम्हाला लाभणार त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुण्य मलमासात म्हणजेच अधिकमासात प्राप्त होईल. 
'या अधिकमासात प्रत्यक्ष भगवंत भक्तासाठी पृथ्वीवर येतात व लोकांचे पाप क्षालन करून त्यांचा उद्धार करतात. हा महिना प्रत्यक्ष भगवंताची 'विभूती' आहे. हे रहस्य गोकुळातील गोपींना माहीत होते. प्रात:काळी स्नान, पूजा, दीपदान, ब्राह्मण पूजन करून ब्राह्मणांना मिष्टान्न दिले, कारण प्रत्यक्ष भगवंतानी सांगितले की, ब्राह्मण हे माझेच मुख आहे.
 त्यामुळे गोपींनी प्रात:काळी पूजा, अर्चा व दीपदान देऊन ब्राह्मण पूजन करून ब्राह्मणांना मिष्टान्न भोजन दिले. गोपींच्या भक्तीमुळे भगवंत श्रीकृष्ण संतुष्ट झाले व गोपींना मोक्षफल दिले. सर्व यज्ञाचे जे फल, पुण्य, सर्व तीर्थाचे, दानाचे फल व पुण्य मिळते ते सर्व एकट्या अधिक मासातील दान, स्नान, ब्राह्मणभोजन व दीपदानाने हजारपट पुण्य मिळते व विष्णू प्रसन्न होतात. हे स्वत: भगवंतानेच ब्रह्मदेवाला सांगितले आहे. 
भारतातील कुरूक्षेत्र हे दानक्षेत्र आहे. नर्मदा तपक्षेत्र आहे. गंगा मोक्षक्षेत्र आहे तर गोदावरी सर्वक्षेत्र आहे. सर्व देवात विष्णू श्रेष्ठ आहे. सर्व यत्रात जपयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व मंत्रात ॐ मंत्रश्रेष्ठ आहे. सर्व पशुत गोमाता श्रेष्ठ आहे. 
'विष्णुरूपी संहस्त्रांश: सर्व पाप प्रणाशन:। अपुप अन्न दानेन मम पाप व्यपोहतु।। अधिक मासात वातावरण भक्तीमय झालेले असते. या मासात प्रात: स्नानाला अधिक महत्त्व आहे त्यामुळे पापक्षय होतो. या महिन्यांत तीर्थस्नानाचा महिमा सांगितला आहे. तीर्थ स्नानाने शरीर, शुचिर्भूत होऊन आरोग्यवर्धन होते. व अखंड सौभाग्य लाभते. या महिन्यात मौनव्रताचे महत्त्व सांगितले. दीपदानाने कुलसंवर्धन होऊन पापक्षय होतो. अधिक मासाच्या पोथीमध्ये कोणत्या दानाचे कसे महत्त्व आहे ते विषद केले आहे. 
अधिकमास हा अधिकाधिक फल देणारा असल्यामुळे अखंड अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. मानवाने सदैव नेहमी पुण्यकर्म करीत जावे, कारण मागील जन्मातील पुण्याचा साठा कधी संपेल हे सांगता येत नाही. या ना त्या कारणाने आपण आपले पुण्य खर्ची घालत असतो. त्यात भर टाकण्याचे काम होत नाही. म्हणून सदैव 'पुण्यसंचय, करण्याचा प्रयत्न करावा. आपले शरीर आपले हातात नाही, ते भगवंताचे स्वाधीन आहे. म्हणून मानवाने देवपूजन, कर्म, धर्म, धार्मिक विधी, यज्ञ, नामस्मरण व्रतवैकल्ये करीत आयुष्य घालवावे. त्यामुळेच आपला नरदेह भगवंत प्रेमी होईल. 
अधिक मासाची देवता होण्यास कुणीही तयार नव्हते. अशावेळी सर्व ऋषी-मुनींनी भगवान 'श्रीहरी नारायणास साकडे घातले. अधिक म्हणजे अतिरिक्त महिन्यात भार घेण्याची विनंती केली. भगवान श्रीकृष्णाने मलमासावर कृपा करून या महिन्यास स्वत:चे नाव 'पुरुर्षोत्तम मास्ा' दिले. साधु, संत, महात्मे, हे चालते-बोलते ब्रह्म असल्यामुळे श्रीहरी विष्णुंनी अधिक मासाचा अधिपती होण्यास स्वीकृती प्रदान केली. आणि तेव्हापासून अधिकमास 'पुरुषोत्तममास' या नावाने प्रसिद्ध झाला. मुकुंद, माधव, मदनमनोहर, राधा प्रियकर असलेल्या गिरीधारी नारायणाला त्रिवार वंदन. 

सौ.मिनाक्षी अशोकराव नारसिंह 
मो.नं.९४२२८६०३३७

Related to this topic: